'प्रताप'च्या अमेय कोळी यांची निवड अखिल भारतीय विद्यापीठ क्रिकेट संघ स्पर्धा
अमळनेर प्रतिनिधि/विशाल मैराळे
अमळनेर: प्रताप कॉलेज मधिल जिमखाना तथा राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थ्यी-खेळाडू अमेय रविंद्र कोळी यांची निवड ही अखिल भारतीय विद्यापीठ क्रिकेट स्पर्धे साठी झाली आहे; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळ्गावचा संघाने प.विभागीय आंतर विद्यापीठीय क्रिकेट स्पर्धा ह्या १ ते १० फेब्रुवारी २०२३ रोजी शिकर,राजस्थान येथे संपन्न झाल्या.यात शिकर,राजस्थानने प्रथम क्रमांक मिळविला,सुरत,गुजरातने द्वितीय क्रमांक मिळविले तर तिसरा क्रमांक हा क.ब.चौ.उ.म.वि,जळ्गावने पटकाविले.या नंतर अखिल भारतीय विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा या कुरुक्षेत्र,हरियाणा येथे २३ मार्च ते १ एप्रिल २०२३ रोजी स्पर्धा होणार आहेत.
जवळपास ३३ वर्षा नंतर अशा प्रकारची संधी उपलब्ध झाली आहे,अमेय कोळी हा साने गुरुजी शाळेचे शिक्षक रविंद्र कोळी यांचा मुलगा आहे,त्याची आई जयश्री रविंद्र कोळी सुद्धा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
या निवड बद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष हरी वाणी,कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे,संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन,प्र-प्राचार्य डॉ.एम.एस.वाघ,उप प्राचार्य डॉ.जे.बी.पटवर्धन,विद्यापीठाचे क्रीडा संचालक तथा विभाग प्रमुख डॉ.दिनेश पाटील,डॉ.देवदत्त पाटील,प्रा.मुकुंद संदानशिव,जिमखाना प्रमुख डॉ.विजय तुंटे,क्रीडा संचालक सचिन पाटील,क्रीडा संचालक अमृत अग्रवाल,डॉ.नलिनी पाटील,प्रा.शालिनी पवार,बाळू देवकते,मंजिद सोनार,सचिन खंडारे आदिनी अभिनंदन केले आहे.