Type Here to Get Search Results !

उमरखेड येथे तालुका स्तरीय समाधान शिबीर संपन्न



उमरखेड येथे तालुका स्तरीय समाधान शिबीर संपन्न


जिल्हा प्रतिनिधी:- संजय जाधव

उमरखेड/दि22 - शासन स्तरावर आवाहन केल्यानुसार उमरखेड येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे खाते बंद झाले आहेत किंवा आधार लिंक नसल्यामुळे त्यांना लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.




अशा सर्व शेतकऱ्यांसाठी उमरखेड येथे यवतमाळ डाक विभाग तथा इंडियन पोस्ट पेमेंट बँके तर्फे खाते उघण्यासाठी बुधवारी भव्य समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

उमरखेड येथील तहसिल कार्यालय मध्ये घेण्यात आलेल्या सदर समाधान शिबीरामध्ये शेतकरी यांना सात बाराचे वितरण करण्यात आले काहि लाभार्थीना राशन कार्ड देन्यात आले. घरकुल लाभार्थी ना घरकुलाचा लाभ चेक व्दारे देण्यात आला. महाराष्ट्र शासन पी एम किसान व भारतीय डाक विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी लाभार्थ्यांना आधार सलग्न खाते उघडण्याकरिता मदत करण्यात आली 

ही मोहीम जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ तर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची बँक खाती बंद झालेली आहेत किंवा आधार लिंक नसल्यामुळे त्यांना लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत अशा सर्व इच्छुक लाभार्थ्यांना नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या बीसी सेंटर मध्ये बँक खाते उघडण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार उमरखेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे आगामी येणारा किसान सन्मान निधी आपल्या खात्यात जमा होणार नाही या उद्देशाने या शिबिरात नवीन खाते उघडून आपला सहभाग नोंदवला या शिबिरात डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती मान्यवरांतर्फे देण्यात आली 

यावेळी मा. आमदार नामदेवराव ससाने, उपविभागीय अधिकारी डॉ. वेंकट राठोड , तहसीलदार डॉ आनंद देउळगांवकर, उमरखेड न. प. मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जामनोर ,व यवतमाळ येथून डाक विभागाचे अधिकारी, पत्रकार संघाचे अध्यक्ष निळकंठ धोबे व पत्रकार मंडळी, शेतकरी, पत्रकार, जन समुदाय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पोस्टाच्या विविध योजनांची उपस्थितांना माहिती करून दिली तथा शिबिरा मध्ये बहुसंख्य लाभार्थींनी नवीन पोस्ट खाते उघडून या योजनेचा लाभ घेतला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News