मोखाडा येथे महिला बालकल्याण विभागाच्या वतीने महिला लोकप्रतिनिधी च्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की पंचायत राज संस्था च्या माध्यमातून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच सदस्य तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य या मध्ये 50%आरक्षण महिलांना असल्या मुळे मोठ्या संख्येने राजकारण महिला वर्गाला प्राधान्य दिले आहे.
त्यामुळे कुपोषण, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण इत्यादी अनेक बाबींचा पाठपुरावा महिला लोकप्रतिनिधी करतील व तो पाठपुरावा करण्यासाठी या मार्गदर्शन शिबिराचा लाभ होईल.
सर्व सदस्यांनी योजनांचा व कायद्याचा अभ्यास करून कारभार करावा असे ही आवाहन श्री प्रदीप वाघ यांनी केले
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ कुसुम झोले,सौ लक्ष्मी भुसारा, अनिता पाटील पंचायत समिती सदस्य, श्री कुलदीप जाधव गटविकास अधिकारी, श्री भाऊसाहेब चत्तर तालुका वैद्यकीय अधिकारी,सौ सुलोचना गारे सरपंच, सौ संजना दापट सरपंच पालघर येथुन आलेलं तज्ञ मार्गदर्शक, तसेच महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
तसेच मोठ्या प्रमाणात महिला लोकप्रतिनिधी यांचा सहभाग होता.* मोखाडा प्रतिनिधी, सौरभ कामडी