Type Here to Get Search Results !

खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा महसूल अधिकार्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही - राहुल बिडवे



खंडकरी शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा अन्यथा महसूल अधिकार्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही - राहुल बिडवे


अकलुज प्रतिनिधी 


अकलुज येथील उपविभागीय अधिकारी कायाँलय येथे माळशिरस तालुक्यातील  खंडकरी शेतकरी साखळी उपोषण पहिला दिवस या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेने जाहीर पांठिबा देऊन खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावे अन्यथा महसूल अधिकार्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा ईशारा रयत क्रांती संघटनेचे राहुल बिडवे यांनी दिला




दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि सदाशिवनगर मळा खंडकऱ्यांच्या मागण्या सदाशिवनगर शिवपुरी मळा श्रीपूर मळा येथील मागणी नुसार शेतकऱ्यांना जमीन मिळावी. ज्यांचा नमुना क्रमांक १ मंजुर झाला आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीची जमीन उपलब्ध करुन द्यावी.  खंडकऱ्यांना ज्या जमिनी मिळालेल्या आहेत त्या वर्ग दोन च्या आहेत त्या जमिनी वर्ग एक करुन मिळाव्यात ज्यांना जमिनी मिळाल्या आहेत त्यांची मोजणी व गटाची फाळणी करून हद्दी खुना करून द्यावी.




 गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या खंडकरी यांच्या बाबतीत तातडीने कार्यवाही व्हावी. ६) ज्यांची जमीन एक एकर च्या पेक्षा कमी गेली आहे ती त्या खंडकऱ्यांना एकर द्यावी. खंडकरी जमिनी वाटप करताना त्यांना पाठ पाणी व रस्ता द्यावा. ज्या जमिनीतून चारी किंवा रस्ता गेला आहे ते क्षेत्र वगळून जमिनी वाटप करुन द्याव्यात. माळशिरस तालुक्यात खंडकरी शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी वाटप करायचे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी अनुभवी प्रांताधिकारी किंवा फक्त खंडकरी प्रश्नासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा.


 ०२ /१०/१९७५. प्रमाणे युनिट धरून जमीन वाटप व हदद् खुना करून मिळावी. ११) औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार (स्टे) प्रलंबित खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप होईपर्यंत संयुक्त शेतीस भाडेतत्वावर जमिनी देऊ नयेत व त्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. १२) २०१२ पासून जमीन वाटपापासून वंचीत राहिलेल्या खंडकरी वारसांना म.रा.शे.म. यांनी संयुक्त शेतीसाठी भाडे तत्वावर दिलेल्या दराप्रमाणे जमीन मिळेपर्यंतची नुकसान भरपाई मिळावी असे निवेदनात म्हटले आहे यावेळी रेल्वे संघर्ष समितीचे नेते अँड सोमनाथ वाघमोडे,खंडकरी शेतकरी नेते भानुदास सालगुडे पाटील, रणजित चव्हाण, सुधाकर पांढरे, विठ्ठल गाढवे,राहुल खटके,अजित शिंदे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad