मोहिदा येथे आज शिवचरित्रावर व्याख्यान
तळोदा: तालुक्यातील मोहिदा (कळमसरे) येथे आज रात्री पुणे येथील शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा लाभ पंचक्रोशीतील जनतेने घ्यावा असे आवाहन आयोजक तसेच ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. तळोदा तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित मोहिदा येथील शिव चौकात आज दि. २८ रोजी रात्री आठ वाजता तळोदा तालुका क्षत्रिय मराठा समाज व मराठा समाज उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित 'छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा समाज' या विषयावर सायंकाळी ७वा. व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तळोदा तालुक्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन तळोदा तालुका क्षत्रिय मराठा समाज व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.