बचपन,ब्लॉसम स्कूल येथे मराठी गौरव दिन साजरा.
तळोदा येथील बचपन ब्लॉसम स्कूल येथे मराठी राजभाषा दिवस दिमाखात साजरा करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी त्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनी मराठी ओवी गात कार्यक्रमात लक्ष वेधले . शिक्षकांनी सुद्धा कुसुमाग्रज यांच्या आठवणी सांगत कविता तसेच मराठीचे महत्त्व सांगितले. प्राचार्य विजयकुमार पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी सांगत मराठीचे महत्त्व व्यक्त केले. उपप्राचार्य सकिना मर्चंट तसेच शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.
चेअरमन डॉ. योगेश पुरुषोत्तम चौधरी यांनी मराठी भाषेच्या जडणघडणीत कुसुमाग्रजांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत विविध कथा, कविता, नाटके, कादंबरी, निबंध लिहिल्याचे सांगत शुभेच्छा देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.