पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
" गौरव महाराष्ट्राचा - सन्मान मराठी माणसाचा" याप्रमाणे सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या श्रावस्ती बहुउद्देशिय सेवा संस्थेचा दैदिप्यमान स्नेह सोहळा कोल्हापूर (इचलकरंजी) येथे मोठ्या जल्लोषात पार पडला.या राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा माण ता. विक्रमगड जि.पालघर येथील माध्यमिक शिक्षक तसेच मोहो खुर्द गावचे सुपुत्र चेतन रमेश ठाकरे सरांना " राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले प्रेरणा पुरस्कार" देवून गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.राजू शेट्टी खासदार - स्वाभिमानी शेतकरी संघटना,आमदार मा.डॉ.सुजित मिणचेकर, मा.अश्विनी ढेंगे,संस्थेच्या अध्यक्षा भक्ती शिंदे,सचिव राहुल वराळे आदी मान्यवर उपस्थित होते.चेतन सरांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून शैक्षिणक,सामाजिक,कृषी, क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबाबत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. हा पुरस्कार देखील सरांना त्यांच्या कमी वयामध्ये मिळविण्याचा मान प्राप्त झाला.जानेवारी महिन्यात सरांना पंढरपूर येथे "महाराष्ट्र आदर्श शिक्षण रत्न"या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात सरांना दोन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणून सर्व स्तरातून सरांचे विशेष कौतुक होत आहे .