वाखारी येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा येथे श्री पिंपळेश्वर विद्यालय वाखारी येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अर्थात कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या अन सांगितले आज आम्हाला शाळा सोडताना खूप दुःख होत आहे आम्हास या शाळेने खूप संस्कार दिलेले आहेत आमच्या जीवनात शाळा आमच्यासाठी टर्निंग पॉईंट आहे प्रत्येक विद्यार्थ्याने सर्व शिक्षकांचा भेट वस्तू देऊन सत्कार केला तसेच शाळेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देण्यात आला
शिक्षकांमध्ये टी एस गायकवाड सचिन शेवाळे एम वाय सावंत यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष एस यु पगार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना जीवनातील अडचणी आणि या अडचणींवर मात करण्यासाठी अडचणींवर मात करण्याकरिता सज्ज होण्यास सांगितले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्वांसाठी अतिशय रुचकर पावभाजी बनवली होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी इयत्ता दहावी वर्ष 2022 23 च्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेत याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते