स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवळा- कळवण रस्त्यावर रास्तारोको! एक तास वहातुक ठप्प
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
कांद्याचे घसरलेले भाव, तसेच
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देवळा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज रस्त्यावर उतरून आंदोलन केले,
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहे .या प्रश्नांकडे मात्र सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या खुर्च्या टिकवण्यामध्येच सत्ताधारी व्यस्त दिसताय. प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सद्या लाल कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे, विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे,या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार प्रयत्न करत नाही .या सगळ्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज देवळा कळवण रस्त्यावर बाजार समितीच्या प्रवेश द्धारा समोर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको करुन लक्ष वेधून घेतले, स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर आंदोलन करण्यात आले, यावेळी शेतकरी एकजुटीचा विजय असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता,
थकित वीज बिलापोटी वीज कंपनी शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडत आहे.उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना विजेचे कनेक्शन तोडले तर शेतकऱ्यांचे पीकं करपून जातील व तो उध्वस्त होईल म्हणून हे विजेचे कनेक्शन तोडू नये, कांद्याला उत्तपादन खर्चावर आधारित भाव मिळावा, कांद्याचे भाव स्थिर राहावेत म्हणून कांद्याला उत्तपादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून दिर्घ कालीन धोरण निश्चित करण्यासाठी तातडीने पावले उचलने आवश्यक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी आंदोलक शेतकऱ्यांसमोर बोलताना व्यक्त केले, महाराष्ट्रातील गांवागांवातील शेतकऱ्यांनी ग्राम सभा घेऊन शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून ठराव संमत करून ते स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर सर्व शेतकरी संघटना मिळत संसदेत पाठवले पाहिजेत असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट यांनी व्यक्त केले, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष तुषार शिरसाठ, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देवळा तालुका मा अध्यक्ष पंडित बापु निकम, सामाजिक कार्यकर्ते श्री विनोद आहेर, आदीनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या,. तसेच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सबसिडी देऊन रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित करायला हव्या. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा साठी तक्रारी नोंदवल्या आहे त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याचे आदेश द्यावेत. सोयाबीन ,कपाशी, कांदा ,द्राक्ष यासारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहे सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्वव्रत करण्यासाठी हस्तक्षेप करून प्रयत्न करावे. अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्री विजय सुर्यवंशी तसेच पोलिस उपनिरीक्षक श्री शिरसाठ यांना देण्यात आले, यावेळी रस्त्यावर शेकडो वहानांची गर्दी झाली होती, तसेच शेकडो कांदा उत्पादक व इतर शेतकऱ्री मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव, जिल्हा अध्यक्ष राज शिरसाट, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने, तुषार शिरसाठ, रविंद्र शेवाळे, मधुकर पाचपिंडे सुभाष पवार, कैलास कोकरे, दिलिप आहेर,विठे्वाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष दीपक निकम,पी डी निकम, संजय सावळे,अमर जाधव , रावसाहेब निकम, संजय सावळे, महेंद्र आहेर,प्रविण निकम, बाळासाहेब निकम,बाळु बोरसे, आदी सह शेकडो शेतकरी उपस्थित होते,
प्रतिक्रिया
आज सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांवर चिखल फेक करत आहेत, शेतकऱ्यांची मात्र राख रांगोळी झाली आहे.त्याकडे कोणाचेच लक्ष नाही, कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे कांद्याचे भाव पडले आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर करण्यात यावे, द्राक्षावरील 32% असणारी इम्पोर्ट ड्युटी ६४% केली त्यावर केंद्र सरकार हतबल दिसत आहे.परिणामी द्राक्षाचे भाव पडले यासारख्या अनेक प्रश्नांवर शेतकरी संतप्त आहे. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करावे लागते आहे् कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक