Type Here to Get Search Results !

शिवाजी महाराजाचा विचार आचरणात आणा : प्रा जयपालसिंग शिंदे



शिवाजी महाराजाचा विचार आचरणात आणा : प्रा जयपालसिंग शिंदे

तऱ्हावद येथे शिवचरित्रावर व्याख्यान



तळोदा: युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करावा.त्यातून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांच्या विचार प्रत्यक्ष आचरणात आणला पाहिजे, तेच खरे शिवजी महाराजांना अभिवादन ठरेल,असे प्रतिपादन प्रा जयपालसिंग शिंदे यांनी केले.

          तळोदा तालुक्यातील तऱ्हावद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तसिद्धार्थ नवयुवक मंडळाच्या वतीने प्रा.जयपालसिंग शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.यावेळी ते बोलत होत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच दिलीप ठाकरे होते. पुणे म्हणून कार्यक्रमाला उपसरपंच कृष्णा गोसावी सेवानिवृत्त बँक अधिकारी गोविंद शिरसाट, फुले,शाहू आंबेडकर विचारमंच तळोद्याचे समन्वयक मुकेश कापुरे,हंसराज महाले सिद्धेश्वर गायकवाड आदी उपस्थित होते.

        सुरुवतीला मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले सावित्रीबाई फुले,बिरसा मुंडा,आदी महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना प्रा.जयपालसिंग शिंदे म्हणाले की,शिवाजी महाराजांनी आपल्याला एकतेच्या संदेश दिला आहे त्यांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली.शिवाजी महाराजांनी स्वराज्यात चुकीच्या गोष्टींना कधीच थारा न देता शेतकरी व सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याच्या प्रयत्न केला.शिवाजी महाराजांच्या सैन्य दलात महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम धर्मातील व्यक्तींवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात नव्हे तर अन्याय प्रवृत्तीच्या विरोधात होते.त्यामुळे शिवाजी महाराजांना एका जाती किंवा धर्मात बंदिस्त न करता ते बहुजनांचे राजे होते.हा संदेश घराघरात पोहोचवला पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ नवयक मंडळाचे निलेश शिरसाठ कपिल शिरसाठ विनोद पानपाटील,सचिन शिरसाठ, बुद्धराज शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन भावना शिरसाठ व देवेश शिरसाठ यांनी केले.





तहसिल कार्यालय तळोदा येथे शिवजयंती निमित्त प्रतिमापूजन

तळोदा : येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या तहसील कार्यालयात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

        याप्रसंगी तहसीलदार गिरीश वखारे, तळोद्याचे जहागीरदार श्रीमंत अमरजीतराजे बारगळ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ डी बी शेंडे, सामाजिक कार्यकर्ते निसार मकरानी,धनराज बारगळ, नथू पिंपरे, मित्तल टवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल,एम एफ पावरा, आदींसह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad