आयडीएफसी बँक व शिवनिश्चल सेवाभावी परिवारातर्फे सहाय्यता निधीचे वाटप
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे: देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळा आयडीएफसी बँक व शिवनिश्चल सेवाभावी परिवारातर्फे सहाय्यता निधीचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या ज्यांचे आई किंवा वडील हयात नाहीत परंतु अभ्यासात पुढे असणाऱ्या विद्यार्थिनींना आयडीएफसी बँक व शिवनिश्चयल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने महाविद्यालयीन शिक्षणासाठी सहाय्यता निधीचे वाटप आयडीएफसी बँकेचे सीएसआर रिजनल मॅनेजर महाराष्ट्र चे श्री. शरद देडे, प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. यशवंत गोसावी व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते कु. दीक्षा दीपक अहिरे, कु. रोशनी संजय अहिरे, कु. कविता खंडू पवार, कु. विद्या महेश बागुल या विद्यार्थिनींना प्रत्येकी ५०००/- रुपयांचा धनादेश देण्यात आला
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे देवळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. पी. टी. पवार सर आयडीएफसी बँक देवळा शाखाप्रमुख श्री मयूर जयस्वाल, श्री अमोल नंदन, व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. बिपिन तुपे यांनी केले.