Type Here to Get Search Results !

कापसाचा ट्रक लुटला 1,23,700 रु मुद्देमाल लंपास पोलिसात गुन्हा दाखल



कापसाचा ट्रक लुटला 1,23,700 रु मुद्देमाल लंपास पोलिसात गुन्हा दाखल



तळोदा : कुकरमुंडा फाट्यावर धावत्या ट्रक थांबवून दोघांनी ट्रकचे अपहरण केले व त्यानंतर कापूस व चालकाकडील रोख लूटून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कन्नड तालुक्यातील चापनेर येथून दि. १ रोजी कापूस भरून आयशर ट्रक (एमएच २० / ईजी - ०७५३) घेवून चालक लखन अंबादास ढगे (३२) रा. जांबाडा टाकळी ता. गंगापुर, जि. औरंगाबाद व क्लीनर मेहमुद दाऊत शेख रा. पिंपरखेड ता. चाळीसगांव हे दोघे निघाले होते. दि.२ रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास नंदुरबार येथून कुकरमुंडा फाट्यावर ट्रक आला असता रिकामा कॅन घेवून थांबलेल्या दोघांनी त्यांच्या


वाहनातील डीझेल संपले आहे, असे सांगून ट्रक थांबविण्यासाठी इशारा दिला. मात्र, चालक ढगे याने ट्रक थांबवला नाही. त्यानंतर त्या दोघांनी आपल्या वाहनाने ट्रकचा पाठलाग केला व पुढे जाऊन आयशर ट्रक पुढे त्यांचे वाहन आडवे लावून ट्रक थांबविला. त्यानंतर दोघांनी ट्रक चालक व क्लिनरला चाकूचा धाक दाखवुन ट्रकवर ताबा मिळविला. चालक व क्लिनरने आरडा-ओरड केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून ट्रक पळवून नेला. ट्रक उलट दिशेने शहादा रोडकडे वळवून साधारण १० किलो मिटर अंतरावर मुख्य रोडपासुन धडगांव रोडकडे वळवला व पुढे साधारण ७ किलो मिटर अंतरावर जावुन आंबागव्हाण फाटा ते रोझवा पुनर्वसन गावाच्यादरम्यान ट्रक थांबविली. तसेच तेव्हा आयशरच्या मागे


असलेल्या ट्रकमधून आणखी दोघे उतरले. त्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता. त्यांनी चालक व क्लिनरला नॉयलॉन दोरीने बांधुन रोडच्या बाजुला असलेल्या इलेक्ट्रीक डीपी जवळ बसविले. आवाज केला किंवा कोणाला सांगितले तर मारुन टाकु अशी धमकी दिली. त्यातील एकाने चालकाच्या खिशातील १२ हजार रुपये व दोन मोबाईल काढुन घेतले. त्यानंतर चौघे १२ क्विंटल कापूस, डीझेल टाकीतून साधारण ६० लिटर डीझेल काढुन घेवुन ट्रकने पसार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चालक लखन आंबादास ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात चौघा अनोळखी दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News