जव्हार - दिनेश आंबेकर
विक्रमगड - आरोहन संस्था व ग्रामपंचायत गोमघर यांच्या संयुक्त विद्यमाने दुधगाव येथे माता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की मोखाडा तालुक्यातील कुपोषणाचा कंलक मिटविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, तसेच माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली पाहिजे.प्रत्येक मातेने वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन,सकस आहार घेतला पाहिजे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
शिवाय आरोहन संस्था हि नेहमीच असे लोकाउपयोगी कार्यक्रम आयोजित करुन जनजागृती करते, तसेच ग्रामपंचायत ने देखिल पुढाकार घेतला या बद्दल कौतुक केले.
यावेळी सदृढ बालक,माता यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थी यांनी महीलांच्या जीवनावर आधारित भाषणे केली.
ग्रामपंचायत सरपंच सुलोचना गारे यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्रामपंचायत च्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भरत गारे साहेब यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की महिला बचत गट व शासकीय योजनांचा लाभ आपण घेतला पाहिजे .
यावेळी ग्रामसेवक श्री रजपूत, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य भगवान झुगरे श्री दिलीप जागले, श्री खडके,सौ सुनिता वारे, श्री नंदकुमार वाघ, श्री गणेश खादे, श्री पांडुरंग गवारी, श्री शेलार,कदम,
आरोहन संस्थेचे श्रीमती सुंगधा भोये व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.