सिलिंगपूर येथील तरुणांतर्फे जि.प.शाळेस शालेय उपयोगी साहित्य भेट
तळोदा तालुक्यातील सिलिंगपूर येथील होतकरू तरुणांकडून जिल्हा परिषद मराठी शाळा सिलिंगपूर येथील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता ढोल, लेझीम, ताशा असे शालेय उपयोगी साहित्य भेट देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सिलिंगपूर येथील विनोद डोंगरे, सुरेश धानका, जगन ठाकरे, निलेश डोंगरे, प्रफुल्ल लोहार, प्रविण वडर, आशिष मोरे, सुपड्या ठाकरे या होतकरू तरुणांकडून सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता ढोल, लेझीम, ताशा असे शालेय उपयोगी साहित्य
जि.प.शाळेस भेट देण्यात आले.
यावेळी जि.प.शाळेचे मुख्यध्यापक सतिश शिंदे, सहशिक्षक श्री.वसावे सर उपस्थित होते. शालेय सांस्कृतिक साहित्य दिल्याबद्दल मुख्याध्यापक सतिश शिंदे यांनी या होतकरू तरूणांचे आभार मानून कौतुक केले.