आमलाड माध्यमिक विद्यालयात आनंद मेळावा
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर खरेदी विक्री व्यवहारी ज्ञान प्राप्त व्हावे स्वाधिष्ट रुचकर पदार्थांचे स्वाद घेता कला अवगत व्हावी यासाठी विद्यासहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय आमलाड येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विविद्यार्थ्यांनी बनविलेले खाद्य पदार्थ स्टॉल लावली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. व्ही. मराठे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगा माई प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका श्रीमती एल. बी. सरदार, विद्यागौरव इंग्लिश मेडिअम स्कुल प्रभारी मुख्याध्यापक ललित पाठक व विद्यावाहिनी प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता चव्हाण हे उपस्थित होते.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वाय. एस. मासुळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक आर. बी. कुवर, ए. ए. शेंडे, एस ए. सुर्यवंशी, डी एन. गिरासे, आर. के. पाडवी, श्रीमती आशा जाधव, शिपाई लखन पाडवी यांनी परिश्रम घेतले.