१४ जानेवारी , राष्ट्रीय भूगोल दिन शासकीय माध्यमिक आश्रम शाळा घानवळ येथे साजरा करण्यात आला.
मोखाडा / सौरभ कामडी
गेली तीस वर्षे १४ जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. विषयानुरूप ‘दिन’ पाळण्याची एक परंपरा महाराष्ट्रात रुजू झाली आहे. मराठी दिन (२७ फेब्रुवारी), विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी), तर संस्कृत दिन (आषाढस्य प्रथम दिवसे) इत्यादी. त्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा विषय म्हणजे भूगोल हा दिवस घानवळ येथे भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणून या दिवशी भूगोल दिन हा साजरा केला जातो या विषयावर श्री पडघे सर,कापुरे म्याडम,जाधव सर यांनी भूगोल विषयाचे जीवनातील महत्त्व, पर्यावरण संवर्धन, भूगोलचा इतर विषयाची सहसंबंध कसा असतो याची विस्तृत माहिती सांगितली आणि अनेक उदाहरणे देऊन भूगोलाचे महत्त्व विशद केले. यावेळी भौगोलिक तक्ते बनविण्याची स्पर्धा घेतली त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या वेळी कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. गडाख सर, अधिक्षक श्री. शिंदे सर, वर्गशिक्षक श्री. पडघे सर, गंगथडे सर, कापुरे मॅडम, जाधव सर, पाटील सर, कनोजा मॅडम, गवारी मॅडम इ. व सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो सौजन्य:-संदीप भारती सर