Type Here to Get Search Results !

पिंपरी-चिंचवड ते चाकुर पत्रकार एकता रॅली निघणार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची घोषणा



आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा ५ मार्च रोजी चाकुर येथे होणार मेळाव्याच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड ते चाकुर पत्रकार एकता रॅली निघणार मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांची घोषणा


मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे 5 मार्च 2023 रोजी संपन्न होत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख यांनी केली आहे.. मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणारया तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागातच घेतले जातात. यावर्षी हा सोहळा चाकूर येथे होत आहे.. रविवार, दि. 5 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता पुरस्कार वितरण सोहळा सुरू होईल. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावं यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे राज्य प्रवक्ते गणेश हाके हे कार्यक्रमाचं स्वागताध्यक्ष असतील..


चाकूर मेळाव्याच्या निमित्तानं पिंपरी चिंचवड ते चाकूर अशी पत्रकार एकता रॅली काढली जाणार आहे.. ही रॅली 3 मार्च रोजी सकाळी ४ वाजता पिंपरी- चिंचवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघेल.. तो पिंपरी चिंचवड, पुणे, रांजणगाव, शिरूर, पारनेर, नगर, कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा मार्गे रात्री बीडला पोहचेल.... रॅलीचा मुक्काम बीड येथे असेल.. रॅली 4 मार्च रोजी सकाळी चौसाळा येथे जाईल.. तेथून केज, अंबाजोगाई. रेणापूर, लातूर मार्गे चाकूरला जाईल.... चाकूर मध्ये मिरवणूक काढली जाईल.. रॅली ज्या ज्या शहरातून जाईल तेथील पत्रकार आणि लोकप्रतिनिधी रॅलीचं गावच्या वेशीवर स्वागत करतील. रॅलीत मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर. सरचिटणीस मन्सूरभाई, कोषाध्यक्ष विजय जोशी तसेच परिषदेचे अन्य पदाधिकारी असतील.. ज्या गावातून रॅली जाईल तेथील तालुका. जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य रॅलीत सहभागी होतील.. रॅली आपल्या गावात किती वाजता पोहचेल हे दोन दिवस अगोदर कळविले जाईल.. गाडीवर परिषदेचा ध्वज व एक स्टीकर असेल. रॅलीत किमान 50 गाड्या असाव्यात यादृष्टीने नियोजन केले जात आहे. रॅली आणि मेळावा यशस्त्री करण्यासाठी टीम चाकूर जोरदार प्रयत्न करीत आहे.. या मेळाव्यासाठी राज्यभरातून किमान 600 प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.. तसे नियोजन स्थानिक संयोजन समितो करीत आहे...


यंदाचे पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे- नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा, अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती. लातूर विभाग : औंढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली. नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव, पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे, कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली, औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद. कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड. मराठी परिषदचे राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी प्रसिद्धीस दिले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News