विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे दिनदर्शिकेचे वाटप
विश्व हिंदू परिषद कार्यालय नवापूर येथे विहिंप नंदुरबार जिल्हा महामंत्री विजयराव सोनवणे, सहमंत्री अजय कासार यांनी भेट दिली व स्थानीय विहिंप कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय विश्व हिंदू परिषद जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख किरण टिभे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत दर्शन पाटील यांनी केले.
जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे म्हणाले की, आपल्या प्रखंडाचे काम अत्यंत उत्तम सुरू असून प्रत्येक ग्रामीण विस्तार प्रत्येक गावा पावतो पोहोचविण्याचा प्रयत्न व हनुमान चालीसाची प्रत्येक हनुमान मंदिर जवळ झाले पाहिजे असा जास्त प्रयत्न आपण करू. तर जिल्हा सहमंत्री अजय कासार म्हणाले की, नवापूर प्रखंड ने हितचिंतक अभियान प्रत्येक गाव आणि माणसा पावतो पोहोचविण्याचे कार्य आपण केले व प्रखंड मध्ये चाललेले उपक्रम व त्या बाबत करावयाची कार्यवाही याबाबत सखोल व महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. सोबत जिल्हा सहमंत्री श्यामरावजी गावित यांनी आगामी उपक्रम बाबत अवगत केले. त्यानंतर कार्यकर्ते सोबत चर्चा करून दिशानिर्देश दिले.
तसेच श्री दत्त मंदिर सभा मंडपात मंदिराचे मुख्य पुजारी योगेश पाथरकर यांनी मंत्रोपचार करून शहरातील ज्येष्ठ नागरिकांसमवेत विश्व हिंदू परिषद दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या बैठकीला भागवत चौधरी, अनिल मोरे, संदीप पाटील, हितेश पाटील, विक्की सोनार, सनी पाटील, रवि आहुजा आदी उपस्थित होते.