तालुका स्तरीय विविध गुनदर्शन स्पर्धेत करोळ शाळेचे यश
दिनांक २७/०१/२०२३ रोजी मुरलीधर नानासाहेब मोहिते कॉलेज येथे पार पडलेल्या मोखाडा तालुकास्तरीय विविध गुनदर्षण स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा करोळ शाळेचा समूहगीत मोठा गट या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला तर वक्तृत्व स्पर्धा मोठा गट या मध्ये कु. पूनम शांतीलाल लोखंडे या विद्यार्थिनीने जल संवर्धन या विषयावर सादर केलेल्या भाषणास प्रथम क्रमांक मिळविला तालुक्यातील १३ केंद्रा मध्ये पार पडलेल्या समूहगीत, वक्तृत्व , नाट्य लहान गट मोठा गट या स्पर्धांमध्ये १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता . विजयी संघ आणि विद्यार्थी आत्ता जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत . विद्यार्थ्यांचे हे यश प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा करोल चे मुख्याध्यापक विलास साबळे सर , पदवीधर शिक्षक (केंद्रप्रमुख) सखाराम रेरे, सर , सोनटके मॅडम , वैद्य मॅडम , दिनेश देसले सर , ज्ञानेश्वर हिंगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले , विजयी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
मोखाडा प्रतिनिधी, सौरभ कामडी