चित्रकला स्पर्धेमध्ये एस.पी.स्कूलचे नेत्रदिपक यश
प्रतिनिधी विनोद धुमाळ जांबुड
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शिक्षा मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये एस.पी. स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
ही स्पर्धा इयत्ता नववी ते बारावी गटामध्ये घेण्यात आली .यामध्ये पंढरपूर तालुक्यातून जवळपास सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .यातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले तसेच 10 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य म्हणून बक्षीस देण्यात आले यामध्ये एस.पी. स्कूलच्या इ . अकरावी मधील ऋतुजा विलास वाघ हिच्या चित्राची निवड झाली तर 25 विद्यार्थ्यांना एक्सलन्स आर्ट म्हणून बक्षीस देण्यात आले, यामध्ये इयत्ता नववी मधील शिवचरण रविकांत जाधव याच्या चित्राची निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानपत्र तसेच रोख दोन हजार रुपये देऊन करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, केंद्रप्रमुख अण्णासाहेब पवार, उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार होनराव, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण,प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांना सोमनाथ ढावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.