पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने पुणे शहरातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षिकांसाठी राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराचे आयोजन पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ येथे करण्यात आलेले होते.यावेळी रूपाली चाकणकर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. समाज शिक्षित व संस्कृत करण्यामध्ये शिक्षकाची महत्त्वाची भूमिका असून शिक्षकाचे कार्य अतुलनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेतल्या आठवणींना उजाळा देत शिक्षकच एखाद्या विद्यार्थ्यांचा आयुष्य कसं चांगलं घडू शकतात याचा निर्वाळा दिला.
यावेळी पुणे शहरातील तेरा मुख्याध्यापिकांना राजमाता जिजाऊ गुणवंत मुख्याध्यापिका, बत्तीस शिक्षिकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत पुरस्कार देऊन राज्य टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
तसेच पुणे विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले शिवाजीराव खांडेकर यांचा तसेच पुणे शहर माध्यमिक शिक्षक पतपेढी मध्ये विजयी झालेल्या तेरा संचालकांचा तसेच पदाधिकाऱ्यांचा सन्मान टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी राज्य टीडीएफचे विश्वस्त के.एस.डोमसे यांची महाराष्ट्र राज्य संयुक्त महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने रूपाली चाकणकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पुणे शहर कनिष्ठ महाविद्यालयीन टीडीएफ च्या अध्यक्षपदी हिरामणबनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय शशिकांत शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच अरविंद मोडक यांची सचिव पदी निवड झाल्याबद्दल नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे रूपाली चाकणकर व राज्य टीडीएफ च्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे समुपदेशक, लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील शिक्षक, टीडीएफचे शहर संघटक भगवान पांडेकर यांनी तयार केलेले विद्यार्थी व पालकांना अतिशय उपयुक्त असलेले करियर विषयक मार्गदर्शक मोबाईल ॲपचे मान्यवरांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी जी. के. थोरात सर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्यापुढे सविस्तर माहिती दिली व सदर समस्या तात्काळ सोडवण्याबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.
यावेळी राज्य टीडीएफचे विश्वस्त के. एस.ढोमसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या.
रूपाली चाकणकर यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत लवकरच शिक्षणाधिकारी, उपसंचालक यांची राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या समवेत बैठक घेऊन प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासन दिले. कार्यक्रमाचेप्रास्ताविक पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष व पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील राजे निंबाळकर, संतोष थोरात सचिन दुर्गाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार संतोष दुर्गाडे यांनी मानले. प्रतिनिधी: दिगंबर वाघमारे