बोचऱ्यात थंडीने ग्रामीण भागातील " शेकोटी " पेटली
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुका तसेच ग्रामीण भागातील वृद्ध माताऱ्याना थंडीचा त्रास जाणवत असून गावात शेकोटीचा जोर वाढला आहे.
आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात थंडी हुडहुडी भरल्याचे चित्र दिसत आहे.
गावात दिवसा व रात्रीला सात आठ वाजताच सर्व सुनसान होऊन चहा टपरीवर, चौकात शेकोट्या पेटवणे सुरू झाले आहे.
ग्रामीण भागात रूम हिटरची व्यवस्था राहत नाही.त्यामुळे शेतकरी मजूर इतर गृहिणी सरपणाच्या काड्याचा गट्टा शेकोटी साठी दुपारी शेतीत गावाजवळील लहान जंगलात जाऊन जमा करतात.
वातावरणा मध्ये दोन चार दिवसांपासून रंग बदललाय ढगाळ वातावरण तयार झाले रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव तर होणार नाही ना अशी चर्चा शेतकरी करीत आहेत.
अगोदरच शेतकऱ्यांच्या हातात येणारी पीक हिसकावून घेतले चार पाच दिवसापासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे.
हिवाळ्यात काही दिवस अशी थंडी राहली तर यावर्षी रब्बी पीक हंगाम चांगला राहील अशी सुद्धा चर्चा शेतकऱ्यांना करीत आहेत,पिकासाठी सध्याची थंडी पोषक असल्याने तूर, हरभरा, गहू या पिकाचे चांगले आवक होईल अशी अशा शेतकऱ्यांना आहे.
या थंडीत लहान बालके,दमा रुग्ण, वृद्ध मातारे वेक्ती, हड्डीरुग्ण यांना ही थंडी घातक ठरू शकते त्यामुळे बराच म्हातारे वेक्ती दवाखान्यात येजा करताना दिसत आहेत