५ वा जाबर कुळ परिवार मेळावा मोखाडा गभालपाडा येथे संपन्न
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी मोखाडा गभालपाडा येथे जाबर कुळ परिवार मेळावा आयोजित करण्यात आला होता आदिवासी जूनी परंपरा नृत्य सादर करून तसेच कुळ देवतांची पूजा करून या मेळावेला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी जिल्हा परिषद पालघर अध्यक्ष मा निकम साहेब यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचे या कार्यक्रमाला योगदान लाभले . वेगवेगळ्या ठिकाणी वरून आलेले जाबर कुळ परिवार चे सदस्य यांचे सर्वाचे गावांचे ग्रुप या पध्यतीने पुष्यकुच्छ व शब्द शुमनाने स्वागत करण्यात आले.
या अगोदर जाबर कुळ परिवाराचा मेळावा हा प्रत्येक वर्षी होत होता पण एकेकाळी २०१९ ला संपूर्ण जगात 'कोरोनाव्हायरस ' हा महामारी संकट आले असून मेळावा या अखंड करण्यात आला होता.परंतु हे संकट गेले असून या वर्षी जाबर कुळ परिवार मेळावा मध्ये महाराष्ट्र राज्य तसेच दादरा नगर हवेली,गुजरात या ठिकाणी वरून हजारो लोखसंख्या ने सामील झाले होते.त्यांनतर जाबर कुळ परिवार चे अध्यक्ष अर्जून जाबर याने मनोगत व्यक्त केले नंतर जाबर कुळ परिवारातील १० ,१२ किंवा इतर सर्व उच्चशिक्षित सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
या मेळावा मध्ये वेगवेगळे प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान जाबर यांनी केले.