आंबाबारी माध्यमिक विद्यालयात माता पालक-शिक्षक मेळावा संपन्न
अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी येथील अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित माध्यमिक विद्यालयात माता पालक-शिक्षक यांच्यातील संबंध दृढ व्हावी महिला मेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात पार पडला.
महिला पालकांकरिता हळदी-कुंकू व तिळ-गुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यापक शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय आंबाबारी येथे संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन तसेच संस्थेचे आधारस्तंभ व स्थानिक स्कूल कमीटीचे चेअरमन आणि कॉलेज ट्रस्ट तळोद्याचे संचालक अरुणभाऊ महाजन तसेच संस्थेचे युवा नेतृत्व व न्यू.हायस्कूल तळोद्याचे उपमुख्याध्यापक अमरदिप महाजन यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने व मुख्याध्यापक यु.एच.केदार यांच्या उपस्थितीत तीळ-गुळ हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला तसेच किशोरवयीन मुलींचे उद्बोधन वर्ग घेण्यात आले, योग्य वयात लग्न, व्यसनमुक्ती ,शारीरिक स्वच्छता, योग्य आहार शिक्षणाचे महत्त्व, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रसंगी विद्यालयाच्या शिक्षिका शिल्पा वळवी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सुत्रसंचलन आणि मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी असे प्रतिपादन केले की, हिंदू धर्मात पूर्वी सती प्रथा होती, पण राजाराम मोहन रॉय यांनी पुढाकार घेऊन ती बंद केली. महिलांच्या शिक्षणाला धर्माचार्यांचा विरोध असे, पण सावित्रीबाईंनी क्रांति केली म्हणून स्त्रीशिक्षणाची कवाडे खुली झाली. तोच आदर्श समोर ठेवून आता संक्रांत सणाच्या हळदी कुंकवाला सौभाग्यवतींच्या बरोबर विधवा महिला भगिनींना सन्मान दिला. आजचे जग खूप बदलते आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानामुळे देशात मोठी क्रांती झाल्याने समाजसुध्दा कालबाह्य प्रथा परंपरा सोडून देतो आहे. बदल हा तसा सृष्टीचा नियम आहे आणि जो काळानुरुप आपले आचार विचार बदलतो तोच प्रवाहात, स्पर्धेत टिकतो.
कार्यक्रमात पोलीस पाटील मनुबाई तडवी ,गावातील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित पालक मातांचे आभार संघमित्रा गवडे यांनी मानले.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.