श्रीराम जवाहर फलटण या भागीदारी संस्थेकडील मयत कामगार कै.सत्यजित बाळासो.भोईटे, चिटबाॅय(हिंगणगाव) याच्या कुटुंबीयांना व्यवस्थापनाच्या प्रयत्नामुळे फरकासह पेंशन लागू
श्रीराम जवाहर साखर, फलटण या भागीदारी संस्थेमध्ये रोजंदारी चिटबाॅय म्हणून कार्यरत असलेले सत्यजित भोईटे यांचा कोवीड काळात ब्रेकवर असताना कोवीडमुळे मृत्यु झाला होता.त्यांच्या पाश्चात्य दोन लहान मुले व पत्नी असा परिवार असुन घरची परिस्थीती हालाकीची असलेमुळे संपूर्ण शेती स्टाफ त्यांच्या कुटुंबीयांसोबत होता व आहे त्यातच व्यवस्थापनाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या कुटुंबाना पेंशन लागू झालेमुळे कै.भोईटे यांचे कुटुंबीय व हिंगणगावातील त्यांचे हितचिंतक कारखाना कार्यस्थळावर येऊन प्रोजेक्ट मॅनेजर श्री पाटीलसाहेब यांना धन्यवाद देऊन आभार मानले.त्याप्रसंगी सदर गटातील अँग्री ओव्हरशिअर श्री संजय श्रीरंग चव्हाण साहेब व त्यांचा सर्व स्टाफ तसेच कामगार युनियन चे मा.शंकरराव गुंजवटे व इतर कामगार/कर्मचारी तसेच हिंगणगावातील लोक उपस्थित होते