Type Here to Get Search Results !

तळोदा येथील श्रीकृष्ण खांडसरीतील ऊसतोड कामगार वसाहत येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले.



तळोदा येथील श्रीकृष्ण खांडसरीतील ऊसतोड कामगार वसाहत येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले.


 आरोग्य वर्धिनी केंद्र-सोमावाल कार्थक्षेत्रात जवळील उसतोडीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर गांवाहुन, कन्नड, चाळीसगांव औरंगाबाद धडगाव, अ. कुवा, तळोदा नंदुरबार आदी ठीकाणाहुन, दरवर्षी येतात. प्रामुखाने गरोदर माता, स्तनदामाता व 0 ते 6




बालके 6 वर्षे वरील सर्व स्त्री/पुरुष यांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार तसेच लसीकरण करण्यात आले. व किरकोळ आजारांचे रुग्णांची तपासणी औषधोपचार करण्यात आले.


शिबीरामध्ये विशेष गरोदर माता व स्तनदा माता यांच्या संपूर्ण रक्त तपासण्या व लघवी तपासणी करण्यात आल्या. व आरोग्यविषयक सल्ला/ मार्गदर्शन करून जनजागृति करण्यात आले एकूण: गरोदर माता 11, स्तनदा माता 27


0 ते 6 वर्षे बालक 28, लॅब चाचणी 53, किशोरवयीन 19,, इतर आजाराचे रुग्ण एकूण 265 रुग्ण तपासणी करुण औषधोपचार करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण 'यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले.


सोमावल वैद्यकीय अधिकरी डॉ. सुधिर ठाकरे यांनी शिबीराचे आयोजन केलो शिबीरात- डॉ. दिपेश बोरसे, डॉ गौरव सोनवणे, डॉ तुषार पटेल डॉ. प्रशांत बढ़ची, भावना ढोलार, हर्षदा चौधरी, के एस. एस. एस. तडवी, ए. व्ही. कुवर. एस. ए. ठाकरे, आर.डी आगळे, व्ही.जे सुसर, एन.एस. तुपे पी.ए. वळवी, जे. एस. वसावेआदींनी परिश्रम घेतले.


 ए. एस. करमरकर (ANM) पी ए वळवी जे. एस. वसावे आदी. यांनी शिबीर यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी कामकाज केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad