Type Here to Get Search Results !

कर्जाचे ओझे असलेल्या शेतकऱ्यांना व नागरीकांना आत्महत्येपासून रोखण्याचे काम धार्मिक एकता संस्थाच करू शकते ; अनिल मोहिते नंदगावकर



कर्जाचे ओझे असलेल्या शेतकऱ्यांना व नागरीकांना आत्महत्येपासून रोखण्याचे काम धार्मिक एकता संस्थाच करू शकते ; अनिल मोहिते नंदगावकर



किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे


देशातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवून आत्महत्या करण्यापासून रोखण्याचे काम धार्मिक एकता संस्था करू शकते असे मत आखिल भारतीय परिवार पार्टीचे हिंगोली लोकसभा प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल मोहिते नंदगावकर यांनी कर्ज मुक्त भारत अभियान राबवितांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले धार्मिक एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने शाहनवाज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करून कर्ज मुक्त भारत अभियान राबविण्याची मोहिम सुरू केली आहे त्याची सुरवात मुंबई येथुन करण्यात करण्यात मुंबई येथून करण्यात आली आहे . देशातील कोणताही व्यक्ती कर्जात राहू नये . कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशातील लोकोशी शेतकऱ्यांशी संपर्क करून त्याची कर्ज मुक्त भारत अभियानाशी नाव नोंदणी करून आत्महत्या करण्यासाठी परावृत करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे कोरोना काळात लाकडाऊनमध्ये देशातील लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत होऊन अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत . याचा परिणाम घेतलेल्या कर्जावर झाला आहे . यामुळे लोक कर्ज फेडण्यास सक्षम नाहीत अशा लोकांसाठी देशातील प्रत्येक लोकसभा मतदासंघात याची जनजागृती करून नाव नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे . सर्व कर्जदारांना कर्जमुक्त फार्म भरून प्रशिक्षित केले जाणार असून आतापर्यंत संपूर्ण भारतातून सुमारे एक लाख लोक संस्थेने जोडले तर महाराष्ट्र राज्यांतील सुमारे तीन हजार लोक फेसबुकच्या माध्यमातून जोडले गेले आहेत याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे एन सी आर बी च्या अहवालानुसार 2021 मध्ये 1 लाख 64 हजाराहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत . या गंभीर परिस्थितीवर लवकर ठोस पावले उचलली गेली नाहीत तर मानसिक नैराश्य आणि आत्महत्येची प्रकरणे वाढू लागतील त्यामुळे भारताच्या मानव संसाधनांची हानी होईल.

हे सर्व टाळण्यासाठी धार्मिक एकता सेवाभावी संस्थेने कर्जमुक्त भारत अभियान अभियान सुरु केले आहे ही संस्था लोकासाठी जीवनहानी म्हणून काम करत असल्याने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या देशातील नागरिकांना आत्महत्या करण्यापासून रोखण्याचे काम धार्मिक एकता संस्थानच करू शकते असे मत अनिल मत अनिल मोहिते नंदगावकर यांनी व्यक्त केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad