मुरबाड शास्त्रीनगर तलावाला तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव
आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते भव्य उद्घाटन
मुरबाड दिनांक ५ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
गेल्या वर्षी दोन वर्षापासून शिषोभीकरणाच्या नावाने रखडलेले शास्त्रीनगर दुधाले पाडा तलावाचे काम अखेर पूर्ण झाले असून या तलावाच्या कमानीचे नामकरणाचा भव्य उद्घाटन सोहळा आज मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला
या तलावाचे सुशोभीकरण करून महाराष्ट्रभूषण ,तीर्थरूप ,डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव मुरबाड नगरपंचायतीचे विद्यमान सर्व नगरसेवक ,नगराध्यक्ष रामभाऊ दुधाले व उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले या सर्वांच्या सर्वानुमते ठराव घेऊन तलावाला नाव देण्यात आले
यावेळी आमदार किसन कथोरे यांनी एक संकल्प करून प्रार्थनेच्या माध्यमातून पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची शुभ पावलं मुरबाडच्या मातीला लागावी ही श्री सदस्य व बैठकीला जाणाऱ्या महिलांकडून प्रार्थना करून आप्पा साहेबांना निवेदन देऊ असे आमदार साहेब व्यासपीठावरून म्हणाले
यावेळी आमदार किशन कथोरे यांनी शास्त्रीनगर दुधालेपाडा सार्वजनिक तलावाच्या भव्य कमानीचे तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने उद्घाटन करून उपस्थित जनसमुदायाला बैठकीचे महत्त्व पटवून दिले आहे .
यावेळी व्यासपीठावर उल्हास भाऊ बांगर जिल्हा परिषद सदस्य, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे, मुरबाड पंचायत समितीच्या सभापती स्वराताई चौधरी, माजी सभापती दीपक पवार, नगरसेवक नितीनअण्णा तेलवणे , बाबुशेठ उर्फ संतोष चौधरी , माजी नगरसेवक रवींद्र देसले ,भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव ,लियाकत शेख सर, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रामभाऊ दुधाले ,उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या