जव्हार चौकिपाडा येथे केंदस्तरीय वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धांचे आयोजन
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
ग्रामीण विकासाचा ध्यास ठेवून तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये लोकपयोगी कामांच्या सोबतच ग्रामीण भागातील जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात कशी आणता येईल या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये दि ०६ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा परिषद शाळा चौकिपाडा येथे एक दिवसीय क्रीडागणावर केंदस्तरीय वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धमध्ये बेहेडपाडा केंदातील सर्व १२ शाळांनी सहभाग घेवून जवळपास ३५० मुलांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुण व कौशल्य दाखवून दिले या स्पर्धेमध्ये लंगडी,खो खो, कबड्डी,संगीत खुर्ची या सारख्या खेळांचा समावेश केला होता.अनुक्रमे लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक सागपाणी संघाने तर कबड्डी आणि खो खो स्पर्धेत बेहेडपाडा व संगीत खुर्ची स्पर्धेत घोडिपाडा संघाने संपादन केले सर्व विजयी संघांना केंद्रप्रमुख श्री जे जे खिरारी सरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.