केळीवेळी येथील महीलेच्या गळ्यातील पोत हिसकावुन पळ काढणाऱ्यां चोरट्यांना गावकऱ्यांनी पाठलाग करुन पकडले!
चोरट्यांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसुन महीलेच्या गळ्यातील पोत केली लंपास.गावकऱ्यांनी चोरट्यांना घेतले ताब्यात.
चोरट्यां विरुद्ध दहीहांडा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल
कुशल भगत अकोट
अकोट.दहीहांडा पोलीस स्टेशन हद्दीतील केळीवेळी येथील घटणा पाणी पिण्याच्या बहाण्याने चार दरोडेखोर घरात घुसले त्यांनी घरातील महिलेच्या पतीला धरून ठेवले आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे २० ग्रॅम दागिने हिसकावून पळ काढला. मात्र गावकऱ्यांनी चार किमी पर्यंत त्यांचा पाठलाग करीत त्यांना पकडले ही घटना केळीवेळी येथे शुक्रवारी दुपारी घडली. केळीवेळी येथील श्रीकृष्ण
वनारे यांच्या घरापासून जवळच ओट्यावर चौघेजण बसले होते.
नंतर ते त्यांच्या घरी आले आणि वनारे यांच्या पत्नीला पिण्यासाठी
पाणी मागितले. त्यानंतर त्यांनी घरातून पाणी आणले आणि त्यांना पिण्यासाठी दिले.
पाणी पिऊन झाल्यानंतर ते निघून गेले. काही वेळानंतर त्यातील
दोघेजण पुन्हा आले आणि सरळ घराचे गेट उघडून घरात घुसले.
त्यातील एका महिलेने घरात कसे काय घुसले असे विचारताच तेथे
असलेले श्रीकृष्ण वनारे यांची कॉलर पकडून एकाने त्यांना मारहाण करत पकडून ठेवले तर दुसऱ्याने महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी व दागिने हिसकले व पळ काढला. त्यानंतर चोर चोर असा आरडाओरड केल्याने गावातील लोक जमा झाले व चोरटे पळालेल्या रस्त्याने
त्यांचा शोध घेऊ लागले काही लोकांनी चोरट्यांना पूर्णा नदीकडे
शेतशिवारातून मोटरसायकलने जाताना पाहिले होते त्यानुसार
लगेच त्या दिशेने गावकऱ्यांनी धाव घेऊन दुचाकीने या आरोपींनी पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले असुन आरोपी विरुद्ध दहीहांडा पोलीस स्टेशन ला कलम394.454.506.भादवी नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास दहीहांडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली psi अरुन मुंडे हे करीत आहेत.