अक्कलकुवा-मोलगी दरम्यान घाटात रस्त्यावरील दरळ उचलण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन
सातपुडा पर्वतातील अक्कलकुवा ते धडगाव- मोलगी रस्त्यावरील वळण घाटात मागीलवर्षी कोसळलेल्या दरडीमुळे आजही रस्त्याच्या लगत दगड व दरळ पडून आहेत. त्यामुळे दुहेरी रस्ता वाहतुकीसाठी एकेरी झाला असल्याने वाहनचालकांची तारेवरची कसरत होत आहे. म्हणून रस्त्यालगत पडलेली दरड उचलून घाट परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात यावी.अशी मागणी अक्कलकुवा पं.स.च्या उपसभापती मेलदीबाई वळवी यांनी केली आहे
याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यापूर्वी पावसाळ्यात अक्कलकुवा मोलगी रस्त्यावरील घाट परिसरात दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे या रस्त्याच्या लगत आज देखील दरडीच्या दगड व माती पडून आहेत. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी रस्ता वाहतुकीसाठी दुहेरी असतांना देखील दरडी पडून असल्यामुळे एकेरी बनला आहे. म्हणून घाट भागातून जातांना वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. डाब. देवगोई व मालेआंबा या परिसरातील रस्त्यालगत मोठ्याप्रमाणात दरडी पडून आहेत दुर्गम भागातील नागरीक याच रस्त्याने ये-जा करतात. नेहमी वाहनांची वर्दळ असते. म्हणून रस्त्यालगत पडलेल्या दरळी उचलून दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी अक्कलकुवा पं.स.च्या उपसभापती मेलदीबाई अमृत वळवी यांनी निवेदनातून केली आहे