Type Here to Get Search Results !

रांझणी येथे सॅम मॅम बालकांचे स्क्रिनिंग



रांझणी येथे सॅम मॅम बालकांचे स्क्रिनिंग



तळोदा तालुक्यातील रांझणी येथील अंगणवाडी केंद्रात कुपोषण बालमृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयाने शुन्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांची शंभर टक्के आरोग्य तपासणी करण्यात येत आहे,यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांनी भेट देऊन आरोग्य तपासणी बाबत आढावा घेत मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ महेंद्र चव्हाण यांनी बालकांचा आरोग्याबाबत आढावा घेत आलेल्या स्तनदा मातांना सहा महिन्यानंतर अंगावरच्या दुधाच्या बरोबरीने वरचे अन्न चालू करण्याबाबत सांगत, ताजे पूर्ण मऊ केलेले अन्न वारंवार देण्याचे सांगितले तसेच जंत ,जुलाब टाळण्यासाठी संडासचा वापर करायला मुलांना शिकवा, स्वच्छ पाणी द्या, बाजारातील उघडे पदार्थ देण्याचे टाळा ,आहारात शक्यतो भाजीपाला, मोसमाप्रमाणे एखादे फळ, अंडे यांचा समावेश करण्याबाबतही सांगितले. जर मूल माती खाऊ लागते तर बाळाला अन्नघटक कमी पडत असल्याचे समजावे व मुलांच्या आहारातील पोष्टिक पदार्थ वाढवावेत तसेच रोज बाळाला तीळ तेलाने मसाज करावा असे त्यांनी यावेळी सांगितले. 

  दरम्यान कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार आणि आवश्यक आरोग्यसेवा यांची सांगड बसल्याने कुपोषणावर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कृष्णा पावरा, जिल्हा क्षयरोग पर्यवेक्षक बाळू पाटील ,अशा समन्वयक प्रमोद मराठे ,आशा स्वयंसेविका मंगल मराठे सीमा भारती, अंगणवाडी सेविका छाया भारती, सखुबाई पाडवी ,वासंती पाडवी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad