Type Here to Get Search Results !

नांदेडमध्ये उड्डाणपुलावर थरार; काँग्रेस कार्यकर्तीवर गोळीबार, हातातून गोळी आरपार



नांदेडमध्ये उड्डाणपुलावर थरार; काँग्रेस कार्यकर्तीवर गोळीबार, हातातून गोळी आरपार


माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार झाला आहे. गेल्या वर्षी नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून नांदेड चर्चेत आहे. आता काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीवर गोळाबार झाल्याची घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.




नांदेड शहराच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर बाफना टी पॉइंटजवळ असलेल्या उड्डाणपुलावर सोमवारी रात्री अकराच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यात महिलेच्या डाव्या दंडातून गोळी आरपार गेली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतवारा पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उपविभागीय अधिकारी (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे यांना ही माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी करून रुग्णालयात जाऊन जखमी सविता गायकवाड यांची भेट घेतली.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. सविता गायकवाड आणि अतीक नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध आयशर खरेदी विक्रीच्या प्रकरणात भोकर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अतीक याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, सविता गायकवाड यांना १४ (१) (अ) नुसार नोटीस देऊन सोडण्यात आले होते. या प्रकरणात परभणी येथील रहीम खान याने साक्ष दिली होती. याचा राग मनात असल्याने सात जानेवारी रोजी सविता गायकवाड आणि फैसल हे दोघेजण परभणीला गेले. साक्षीदार रहीम खान याच्या घरात जावून त्यांनी विचारणा केली. रहीम खान याच्या घरात त्यांनी गोंधळही घातल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad