वार्ताकनाला मज्जाव करणारा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्या.बिरसा फायटर्स
तळोदा(प्रतिनिधी)वार्ताकन करणाऱ्या पत्रकार बंधूना चित्रीकरण, दूरचित्रीवाहीनी वृतांकन मज्जाव करणाऱ्या निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा यासाठी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,जिल्हाध्यक्ष भरत पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार व आयुक्त नाशिक यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,दि.०३ जानेवारी २०२३ रोजी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा यांनी शासकीय शाळा,एकलव्य,शासकीय वसतिगृहात दुरचित्रवाहीनी,चित्रीकरण,फोटो काढण्यास वृतांकन करणाऱ्यांना मज्जाव करण्याचे पत्र सर्व मुख्याध्यापक,अधीक्षक यांना काढले आहे.याला बिरसा फायटर्स जाहीर निषेध नोंदवत तीव्र विरोध केला आहे.गरीब विदयार्थ्यांच्या शाळेतील, वसतिगृहातील समस्या जनतेसमोर येऊ नये म्हणून स्वातंत्र्याचा हक्कावर गदा आणून, लोकशाहीचा गळा दाबला जातो का?असा प्रश्न उपस्थित केला आहे.एका मोठ्या अधिकाऱ्यांकडून असे परिपत्रक काढले जाते;हे अतिशय दुर्दैवी बाब आहे.पत्र त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.अन्यथा,बिरसा फायटर्स तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.