तळोदा पोलिस ठाण्याच्यावतीने ब्लँकेट वाटप
तळोदा येथे पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून तळोदा पोलिस ठाण्याच्यावतीने गोरगरीब लोकांना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. कुडकुडत्या थंडीत उबदार शॉल वाटप करीत मायेची ऊब दिली उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सध्या जिल्हाभरात थंडीची तीव्रता वाढल्याने गरीब लोकांना थंडीपासून बचाव व्हावा यासाठी पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेला प्रतिसाद देत तळोदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडीत सोनवणे यांनी गोरगरीब लोकांना ९० ब्लॅकेटचे वाटप केले. नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने व नववर्षानिमित्त गरीब निराधार व्यक्तींना ब्लॅकेट देत माणूसकीची उब दिली आहे.पोलीसांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे