विरोधी पक्ष नेता अजित पवार याच्या बेताल वक्तव्याचा विरोधात तळोद्यात तीव्र निषेध आंदोलन
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याचा विरोधात तळोदा भाजपतर्फे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यात तळोदा येथे दिनांक 2 जानेवारी रोजी तळोदा मंडल स्तरावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या सूचनानुसार तळोदा येथे तीव्र निषेध आंदोलन केले.त्या आंदोलनात शहादा / तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी, किसान मोर्चा सरचिटणीस श्याम भाऊ राजपूत, आदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष दारासिंग वसावे,युवा उपाध्यक्ष बब्बु नाना शहराध्यक्ष योगेश चौधरी, शहर युवा अध्यक्ष योगेश चव्हाण,महिला मोर्चा अध्यक्ष ,नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक गौरव वाणी,अरविंद प्रधान, धनराज पाडवी, कल्पेश चौधरी,सरपंच रायसिंग मोरे,निलाताई मेहता, रशिलाताई व इतर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.