जिल्ह्यात जि.प.शाळेत पटसंख्येनुसार वर्गखोल्या बांधून द्या.
बिरसा फायटर्स (वर्गखोल्या अभावी इ.१ ते ४ थी एकत्रित वर्ग)
तळोदा:- जिल्ह्यात अनेक पाड्यात वर्गखोल्या अभावी इ.पहिली ते चौथीचे वर्ग एकत्रित अध्यापन केले जाते.त्यासाठी पटसंख्येनुसार वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी बिरसा फायटर्सने मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्ह्याधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,विद्यार्थी हे भावी भारताचे भविष्य आहे.प्राथमिक शिक्षणापासूनच गुणवत्तापूर्ण,आनंददायी शिक्षणासाठी वर्गखोल्यासह भौतिक सुविधा प्रत्येक शाळेत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद शाळेत अपुऱ्या वर्गखोल्यामुळे इयत्ता १ ली ते इ.४ पर्यतचे वर्ग एकत्रितपणे अध्यापन केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.इयत्ता ३ री व ४ थीचा वर्गाना अध्यापन केले तर इ.१ ली व इ.२ रीचा विदयार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार आकलन होऊ शकत नाही.प्रत्येक इयत्तेत ज्या पायाभूत क्षमता स्तर आहेत,त्यांच्या विकास होणे आवश्यक आहे.यासाठी जिल्ह्यात विद्यार्थी संख्येनुसार ज्या जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्या पुरेशा नाहीत त्या ठिकाणी वर्गखोल्या बांधून द्याव्यात.व शालेय भौतिक सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात.लोकसहभाग,ग्रामपंचायत यांचेही सहकार्य घेण्यात यावे.काही शाळेतील शिक्षक वेळेवर शाळेत येत नसल्याचे पालकांच्या तक्रारी आहे.संबधित केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकारी यांना सूचित करण्याचीही मागणी केली आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष भरत पावरा,जिल्हा संघटक यशवंत वळवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा,रापापूर,पाल्हाबार शाखाध्यक्ष शिवाजी तडवी,सहसचिव सतीश पाडवी,गणेश पाडवी,संदीप खर्डे,झिंगा पावरा,रायसिंग वळवी यांच्या सह्या आहेत.
'जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वर्गखोल्या अभावी इ.पहिली ते चौथीचे एकत्रित अध्यापन केले जाते. त्यामुळे विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पटसंख्येनुसार वर्गखोल्या व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.पालकांनीही आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे'
- राजेंद्र पाडवी, राज्य महासचिव बिरसा फायटर्स