तळोदा येथील भोईगल्ली ,कुंभार गल्ली व जोहरी गल्ली याचा संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त मुलांना पतंग भेट देत अनोखा उपक्रम राबविला आहे
लहान बालगोपालाना पतंगाचे वाटप करण्यात आले. प्रथम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. पतंग उडवतांना कोणती काळजी घ्यावी याची माहिती सचिन तावडे यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवदास साठे होते.शहरात अनेक मुले जीव धोक्यात घालून पतंग लुटण्यासाठी धडपडत असतात. काही प्रसंगी अपघात किंवा जीवित हानी होते ते टाळण्यासाठी त्यांना पतंगाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमचे प्रमुख जगदीश वानखेडे, मुकेश सोनवणे, सुधाकर जोहरी, चंद्रकांत भोई, किशोर कुंभार, प्रविण जोहरी , चंदुलाल भोई ,यांनी केले. संतोष वानखेडे गणेश शिवदे ,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश वानखेडे यांनी केले. तर यशस्वितेसाठी
भैय्या जोहरी,नीरज रामोळे,धीरज साठे,सागर कुंभार, मयुर कुंभार, गिरीश वानखेडे, जतीन साठे,तुषार जोहरी,मयुर ढोले, सचिन भोई,जयेश कुंभार यांनी परिश्रम घेतले.