तळोदा तालुका प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि शिक्षण विभाग पंचायत समिती तळोदा यांच्या संयुक्त विद्यमाने तळोदा तालुका विज्ञान प्रदर्शन चे आयोजन दुधाबाई पाडवी माध्यमिक व गंगाधर शिवराम शिंपी कनिष्ठ (कला) महाविद्यालय सोमावल बु येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी एम व्ही कदम हे होते. विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी एकूण 57 उपकरणांसह सहभाग नोंदविला.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत पाटील, विस्तार अधिकारी वसंत पाटील, केंद्रप्रमुख जगन्नाथ मराठे, मुख्याध्यापक निमेश सुर्यवंशी, अजित टवाळे, भास्कर मराठे, सुनील परदेशी, एन व्ही मराठे, निलेश सुर्यवंशी, याकूब पिंजारी, कालूसिंग पाडवी, संजय बागुल, हेमलाल मगरे, किसन बारेला, गोडसे, अतुल सुर्यवंशी, व्यासपीठावर उपस्थित होते.
उच्च प्राथमिक गट 24
माध्यमिक गट 26
शिक्षक 06
प्रयोगशाळा परिचर 01
परीक्षक प्रा. डॉ. एस. आर. गोसावी, प्रा. डॉ. स्वप्नील वाणी, प्रा एल. एन. पाटील यांनी काम पाहिले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.