आमलाड येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन
तळोदा:- विद्या गौरव प्रायमरी, गौरव सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल आणि गौरव कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आमलाड येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रदर्शनाचे उदघाटन अनन्या हर्षवर्धन तांबोळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच पर्यवेक्षक म्हणून विज्ञान शिक्षक योगेश पवार यांनी काम पाहिले. प्रमुख अतिथी संस्थेचे मार्गदर्शक अशोक तांबोळी यांनी उपस्थित रहात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रदर्शन यशस्वीतेसाठी विज्ञान समिती व सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ललित पाठक यांनी केले