जिल्हास्तरीय हॅन्डबॉल स्पर्धा संपन्न
मुलांचा जिल्हास्तर हँडबॉल स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात शहादा तर १७ वर्ष वयोगटात गो. हू.महाजन शाळा व १९ वर्ष वयोगट मध्ये नवापूर येथील धोंगसंगळी आश्रम शाळा अनुक्रमें अजिंक्य पद पटकावले.
आधुनिक काळात आता नवीन व्याख्या तयार झाली असून खेलोगे कुदोगे होंगे नवाब अशी असून अभ्यास सोबतच स्पर्धा युगात आव्हानचा सामना करण्यासाठी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षक्त असणे आवश्यक असल्याने विद्यार्थांनी विजय पराभव ला महत्व न देता खेळणे महत्वाचे असल्याचे मत जिल्हास्तर हँडबॉल क्रीडा स्पर्धेचा उद्घाटक उपप्राचार्य अमरदिप महाजन यांनी केले.
खेळाडूंना सामन्याच्या दरम्यान उत्कृष्ट प्रदर्शन करायचे असल्यास सराव शिवाय पर्याय नाही सरावानेच एक साधारण खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाडू होण्यास मदत होत असते स्पर्धा खेळणे महत्त्वाचे जिंकणे हारणे हे सुरूच असते अशा पद्धतीचे मार्गदर्शन पर वक्तव्य उप प्राचार्य अमरदिप महाजन यांनी केले.
तळोदा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पर्यवेक्षक व स्पर्धेचे उद्घाटक उपप्राचार्य ए. ए.महाजन यांच्या हस्ते झाले.
जिल्हास्तर स्पर्धेचे आयोजन शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो. हू.महाजन.(न्यू हायस्कूल) चा क्रीडांगणावर करण्यात आले होते यात १४ वर्ष वयोगट मध्ये तळोदा नवापूर तर १७ वर्ष वयोगट मध्ये न्यू हायस्कूल तळोदा तर १९ वर्ष वयोगटात नवापूर विजयी होत नाशिक विभाग स्तर स्पर्धासाठी पात्र ठरले आहेत.
यावेळी पर्यवेक्षक बी .जी. माळी, पर्यवेक्षक ए. एल. महाजन, क्रीडा शिक्षक निलेश सूर्यवंशी, पदमेश माळी, टी. टी. कोकणी, किशोर माळी उपस्थित होते पंच म्हणून सचिन शिसोदिया, विकास माळी, जितेंद्र माळी, रामकुमार सूर्यवंशी, निषाद माळी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजक सुनिल सूर्यवंशी तालुका क्रीडा संयोजक यांनी केले होते .
या यशा बद्दल संस्थेचा अध्यक्षा मंगलाताई अरुणकुमार महाजन कॉलेज ट्रस्ट चे संचालक अरुणकुमार महाजन शाळेचे प्राचार्य अजित टवाळे, उपप्राचार्य प्रा. अमरदिप महाजन पर्यवेक्षक बी. जी. माळी, कार्यालयीन अधीक्षक डी. पी. महाले यांनी अभिनंदन केले आहे
तळोदा न्यू हायस्कूल येथील दिवंगत हँडबॉल खेळाडू स्व. अजिंक्य पाठक यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाठक कुटंब कडून दर वर्षी फिरती ढाल देण्यात येते त्याचे वितरण संस्थेचे सचिव आर. वी. सूर्यवंशी, संचालक एन. डी.माळी, शाळेचे प्राचार्य अजित टवाळे, उप प्राचार्य अमरदिप महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.