Type Here to Get Search Results !

घरफोड्या व मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला सिंदेवाही पोलिसांनी घेतले ताब्यात.



घरफोड्या व मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला सिंदेवाही पोलिसांनी घेतले ताब्यात.

; पोलिसांची धडाकेबाज कामगिरी


चंद्रपूर प्रतिनिधी

 सिंदेवाही - पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे घरफोडी चोरीच्या गुन्हा दाखल होताच 

 सिंदेवाही पोलिसांनी तपासाचे चक्र गतीमान करत आरोपीच्या शोध घेत चोरी प्रकरणातील फरार आरोपी नामे शुभम प्रल्हाद शेंडे, वय 26 वर्ष, रा. चामोर्शी रोड, कॅम्प एरिया, गडचिरोली, हा चंद्रपुर परिसरात मिळून आला असून त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आलीआहे .तेव्हा सदर आरोपिकडुन एक बिना नंबरची HF Deluxe मोटार सायकल, एक बिना नंबरची एक सुझुकी एक्सेस मोपेड गाडी या सर्व वाहने जप्त करण्यात आली आहे. व आरोपीने घरफोडी गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल गडचिरोली येथे त्याचे घरी लपवून ठेवल्याचे कबुली दिल्याने आरोपीचे घरून सदर घरफोडी गुन्हयातील चोरी मुद्देमाल 1 लाख 85 हजार रुपये

असा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे. 

तसेच सिंदेवाही पोलीस स्टेशन ला दि. 20/09/2022 रोजी अप क्र 243/2022 कलम 379 भादवि अनव्ये गुन्हा नोंद असून सदर 

 चोरीस गेलेली पॅशन प्रो मोटार सायकल क्र MH 34 AT 1641 असा एकूण 3,15,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस ठाणेदार योगेश घारे , पोलीस हवालदार बावणे ,रहाटे मंगेश मातेरे ,रणधीर मदारे ,अरविंद मेश्राम यांनी केले आहे.


चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News