कुटासा येथे डॉ पंजाबराव देशमुख या़ंच्या १२४ वी जयंत्युत्सवा निमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न.
.शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांची भव्य पालखी सोहळा मिरवणूक. शिक्षकांची व विद्यार्थीची मोठ्या संख्येने उपस्थिती.
शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयघोषाने दुमदुमली कुटासा नगरी
कुशल भगत अकोट
अकोट तालुक्यातील कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुटासा येथे शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख या़ंच्या १२४ वी जयंत्युत्सवा निमित्ताने आज दि.27/12/2022 रोजी शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा पालखी सोहळा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कुटासा येथुन सकाळी ९ वाजता गावातील प्रमुख मार्गाने मार्गस्थ झाला तर या पालखी चे भाऊराव देशमुख माजी जि प अध्यक्ष शिवाजीराव देशमुख पोलीस पाटील गजाननराव उगले नागोराव देशमुख गजाननराव थोरात यांनी पुंजन व हारारपण केले व कार्यक्रमाला उपस्थिती लावली तर पालखी सोहळ्यानिमित्त वर्ग १० च्या मुलींनी विविध प्रकारचे न्युत्य व लेझीम सादर केले
अभिषेक लाखे या विद्यार्थेने छत्रपती शिवाजी महाराजाची भुमिका घेतली यावेळी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यी फेटे बांधुन पालखी सोहळा मिरवणुकीत सहभागी झाले तर कुटासा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया चे प्रभारी मुख्याध्यापक संतोष चरपे सर उत्सव प्रमुख सतिष चतार सर आरु सर राठोड सर अंकुश देशमुख सर राऊत सर ठाकरे सर नरवास वस्तिगुह सहाय्यक गणेश पागुत व सर्व शिक्षक व विद्यार्थीनी परीश्रम घेतले होते तर गावकऱ्यांनी शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत केले...शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.