आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी कॉमर्स या वर्गातील रोहित विजयसिंह परदेशी या विद्यार्थ्याची नाशिक येथे झालेल्या विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले. या विद्यार्थ्याची उंच उडी या खेळासाठी राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे.
या विद्यार्थ्याचे अभिनंदन आर्ट्स व कॉमर्स कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष माननीय भरतभाई माळी, उपाध्यक्ष माननीय प्रा सुधीरकुमार माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस एन शर्मा, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. बी. हुंबरे, पर्यवेक्षक प्रा.के.आर.पद्मर, प्रा.डॉ.सुनील गोसावी, मुख्य लिपिक राजेश हिवरे, क्रीडा शिक्षक प्रा.निषाद माळी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्याचा यश संपादन केल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या विद्यार्थ्यांला कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा.निषाद माळी यांचे मार्गदर्शन लाभले.