Type Here to Get Search Results !

म्हसावद पिंप्री शेत शिवारात बिबट मादी मृतावस्थेत आढळली



म्हसावद पिंप्री शेत शिवारात बिबट मादी मृतावस्थेत आढळली



शहादा तालुक्यातील म्हसावद पिंप्री शेत शिवारात बिबट मादी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच भिती चे वातावरण पसरले आहे याबाबत राणीपुर वन विभागात याची नोंद करण्यात आली आहे.



  

 याबाबत अधिक वृत्त असे की, शहादा तालुक्यातील पिंप्री येथील कन्हेरी नदी ला लागून संजय श्रीपत पाटील यांचे पिंप्री शिवारात शेत सव्हे नंबर १७/१ क्षेत्र आहे या शेतात केळी पिकात नेहमी प्रमाणे ते आज सकाळी दहा वाजता नियमित कामकाज निमित्ताने ते शेतात फेरफटका मारीत असताना त्यांना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आले ते शेतातून घाबरून गावात बाहेर परत आले तेव्हा त्यांनी या शेतात मादी बिबट्या मयत आढळून आले असल्याची माहिती शेत मालकाने तात्काळ वनविभागाला दिली तसेच ग्रामसेवक व ग्रामस्थांना याबाबत माहीती दिली.




तात्काळ राणीपुर वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश चव्हाण हे आपल्या कर्मचारी सह दाखल झाले.त्यानी शेती चा परिसराची कसून पाहणी केली असता त्यांना काही ही आढळून आले नाही मृत बिबट्या भक्षक शोधण्यासाठी शोधत आला असेल व याठिकाणी मयत झाला असेल असा अंदाज आहे.मृत बिबट्या दिड ते दोन वर्षांचा आहे मृत बिबट्या चें जागेवरच पंचनामा करण्यात आले डॉ.सुभाष मुखडे यांनी राणीपुर येथे शव विच्छेदन केले मादी बिबट्या कशा मुळे मृत्यू झाला याचा अहवाल आल्यावर समजेल. घटनास्थळी शहादा वन सरंक्षक संजय सांळूखे, तोरणमाळ परिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल महेश चव्हाण, शहादा वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे, तोरणमाळ वनपाल संजय पवार, वनपाल राणीपुर विजय मोहिते, राधेश्याम वळवी, वनरक्षक एस.एम.पाटील, सुभाष मुखडे व कर्मचारी यांनी भेट दिली.मयत बिबटया ला पाहण्यासाठी म्हसावद पिंप्री परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच म्हसावद, पिंप्री, चिखली कानडी, बुडीगव्हाण, पाडळदा, कलसाडी आदी गावाकडे बिबट्या चे मुक्त संचार करीत असतात यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्ग व नागरीकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News