पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी पुरस्कार प्राप्त तारपा वादक भिकल्या धिंडांचा केला गौरव; आदिवासी समाजाच्या रत्नांच्या सदैव पाठीशी.
जव्हार प्रतिनिधी - दिनेश आंबेकर -
जव्हार - केंद्र सरकारचा मानाचा अमृत पुरस्कार नुकताच जाहीर झालेले जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावातील आदिवासी समाजाचे रत्न, महान तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांचा पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्हा परिषद पालघर येथे यथोचित सन्मान केला व त्यांना आर्थिक मदत केली आहे.
यावेळी भिकल्या धिंडा यांनी माध्यमांशी बोलताना धिंडा म्हणाले, की बरेच येतात कौतुक करतात, ट्रॉफी देतात, पुरस्कार देतात पण आर्थिकदृष्टया मदत होणे अपेक्षित असते, सन्मानाबद्दल मी आभारी आहे.
परंतु आर्थिक मदतीची सुद्धा मला अपेक्षा आहे,माझ्यासारख्या कलाकाराची गरज लक्ष्यात घेऊन निकम यांनी मला सायकल देण्याचे ठरवले आहे.
भिकल्या धिंडा हे आदिवासी समाजाचे रत्न असून ते प्रचंड कष्टाळू आहेत.त्यांची कष्ट करण्याची तयारी, जिद्द,चिकाटी उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे.
मी आदिवासी समाजातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी 89 वर्षाच्या भिकल्या मामांचा आदर्श घेऊन योगा व व्यायामाच्या माध्यमातून शरीर संपत्ती कमवा. ज्या क्षेत्रात रुची असेल त्या क्षेत्रात नावलौकिक कमवा व समाजाची आणि राष्ट्राची सेवा करा.
पालघर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कलाकारांनी आपली कला जोपासून ती वृध्दींगत करावी यासाठी शासन स्तरावर प्रोत्साहनासाठी अनेक योजना कार्यरत असून त्याचा लाभ घेऊन पारंपारिक कला जतन केली पाहिजे यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे निकम यांनी सांगितले.