Type Here to Get Search Results !

देहरे ग्रामपंचायत हद्दीत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करण्याची नागरिकांची मागणी.



देहरे ग्रामपंचायत हद्दीत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सुरू करण्याची नागरिकांची मागणी.


पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर


जव्हार तालुका हा ९९% आदिवासी बहुल तालुका असून या भागातील नागरिकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी गावात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे.त्याच प्रमाणे जव्हार तालूका हा आदिवासी बहुल तालूका असून निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. 

    त्यामुळे आर्थिक साक्षरता होणे गरजेचे आहे. या भागात महिला बचत गट, रोजगार हमी योजना,इतर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना इत्यादी माध्यमातून सध्या ग्रामीण भागात रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे व्यवसाय करून कमावलेला पेसा बचत करण्यासाठी बँकेत जाऊज आर्थिक व्यवहार करावा लागतो. सध्या ग्रामीण भागात बँकांचे जाळे खूपच कमी असून यापूर्वी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांची शाखा जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत देहरे येथे अस्तित्वात होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर शाखा बंद केली असून या भागातील देहरे, दसकोड, सावरपाडा,साखरशेत ,दाभलोन,मेढा ,डुंगानी, मोर्चापाडा, भागडा ,ओझर ,पिंपळशेत,चांभारशेत, खरोडा इत्यादी गाव असून या सर्व गावातील नागरिक ३०ते ५०कमी अंतर पार करून जवळपास हजारो लोकसंख्या असलेले ग्रामीण भागातील नागरिकांना पैसे काढणे व ठेवण्यासाठी जव्हार शाखेत यावे लागते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकमेव असलेल्या जव्हार शाखेत नागरिकांची गर्दी होत असते. तसेच या भागातील नागरिकांना बँकेत व्यवहार करण्यासाठी पूर्ण दिवस जातो त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरात आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी आज देहरे गावचे नवनिर्वाचित युवा सरपंच जितेश हरिश्चंद्र भोये यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जव्हारचे शाखा व्यवस्थापक यांच्याकडे लेखी तक्रार करून लवकरात लवकर देहरे येथे आपली पूर्वी असलेली शाखा पुन्हा सुरू करावी अशी मागणी केली आहे. सदर शाखा सुरू झाली तर या भागातील १०ते १२गावातील नागरिकांची होणार गैरसोय दूर होऊ शकते व त्याचा वेळ वाचू शकतो असे मत युवा सरपंच जितेश भोये यांनी व्यक्त केले आहे. तरी आमची मागणी लवकरात लवकर ही मागणी मान्य करावी व आपली शाखा येथे पुन्हा सुरू करावी त्यासाठी ग्रामपंचायत मार्फत आपल्याला सहकार्य केले जाईल अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्या शांता भोये ,प्रियांका वाघ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते 

विश्वनाथ भोये ,संदिप भोये दुर्गादास महाले इ. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News