Type Here to Get Search Results !

मुरबाड पंचायत समिती कर्मचारी व अधिकाऱ्यांविना सलाईनवर



मुरबाड पंचायत समिती कर्मचारी व अधिकाऱ्यांविना सलाईनवर

 

जि प सदस्य सुभाष आप्पा घरत यांनी घेतली कर्मचारी व अधिकाऱ्यांची झाडाझडती

 

   

मुरबाड दिनांक 17 प्रतिनिधी लक्ष्मण पवार                 

  


  तालुक्यातील नागरिकांना अनेक महत्वाची कामे पंचायत समितीमार्फत करावी लागतात. पंचायत समिती ही लोकशाहीतील महत्वाची प्रशासकीय केंन्द्र आहे. परंतु येथे काम करणारा वर्गच उपस्थित नसेल तर नागरिकांनी कामे कुठे करायची असा प्रश्न सध्या मुरबाड मधील नागरिकांना पडला आहे. मालशेज घाटाच्या पायथ्या पासून नागरिक या ठिकाणी आल्यानंतर त्यांना थातूर मातूर उत्तरे देऊन परत पाठवले जाते. सध्या मोजकेच अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायत निवडणुक कामा करिता पाठवले असले तरी उर्वरीत कर्मचारी , अधिकारी कुठे जातात ? काय करतात याचा कुणालाही मागमुस नसतो. 




 पंचायत समितीचे सामान्य प्रशासन विभाग , ग्रामपंचायत , शिक्षण, बांधकाम , पाणीपुरवठा, व अन्य असे महत्त्वाचे विभाग असतानाही यातले शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी , ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी,वरिष्ठ लिपिक , कारकून गायब असल्याने नागरिकांची कामे करणार कोण ? 




 याशिवाय गावचा प्रशासकीय कारभार पाहणारे ग्रामसेवक आपले फोन नाॕटरिचेबल ठेवून आठ आठ दिवस गायब असतात. यावर अकुंश कोणाचा आहे की नाही अशी चर्चा नागरिक करत असून सध्या गटविकास अधिकारीही १२ तारखे पासून १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने पंचायत समितीला कोणी वाली नसल्यासारखे झाले आहे त्यामुळे मुरबाड पंचायत समिती सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे असे जि .प .सदस्य सुभाष आप्पा घरत यांनी कर्मचारी व अधिकारी यांची झाडाझडते घेताना. दिसून येत आहे  



!आवो जावो घर तुम्हारा !  

 

अशी वाईट परिस्थिती मुरबाड पंचायत समितीची झाली असल्याने या संदर्भात काही जागृत नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांच्याकडे तक्रार केली असता सुभाष घरत यांनी आज पंचायत समिती कार्यालयात भेट देऊन झाडाझडती घेतली असता त्यांनाही समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.  



    " *तालुक्यातील नागरिक ४० ते ५० कि.मी. प्रवास करुन तसेच पदरचे दोनशे रुपये खर्च करुन तालुक्याला येत असतात माञ येथे आल्यानंतर त्यांची कामे होत नसतील तर या सरकारी अधिकारी वरिष्ठांनी योग्य समज द्यायला हवी व जनतेला न्याय द्यावा. - सुभाष घरत , जि.प. सदस्य*. " 


                                  " तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे त्यामानाने मुळात सर्वच विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांना काही अडचणींना सामोरो जावे लागते यासाठी जिल्हा परिषदेकडे अनेक वेळा कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे परंतु ती पुर्ण होत नाही. - स्वराताई चौधरी , सभापती पंचायत समिती मुरबाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad