Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे २२ डिसेंबरला आयोजन



भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे २२ डिसेंबरला आयोजन


 

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे २२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.


 भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत नागपूर येथे आयोजित केले आहे. 


भटके विमुक्त अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा ताई मुंडे, केंद्रीय राज्य मंत्री डॉ भगवतजी कराड, राष्ट्रीय ओबोसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री अतुलजी सावे, खा डॉ विकासजी महात्मे, खासदार प्रीतमताई मुंडे, आमदार श्रीकांत भारतीय, भिकुजी दादा विधाते, विश्वास पाठक, अतुलजी वझे, रामेश्वर नाईक उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त पदाधिकाऱ्यांशी मार्गदर्शन आहेत


या अधिवेशनात भटके विमुक्तांच्या विविध प्रश्नावर विचार विनिमय होणार आहे. युती शासनाच्या व केंद्र शासनाच्या धोरणांची व विविध योजनांची माहिती भटक्या विमुक्तांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना व समाजाला मिळावी. तसेच भारतीय जनता पार्टीचे काम भटक्या विमुक्त समाजात वाढावे यासाठी भटक्या विमुक्तांचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित केले आहे. 


या अधिवेशनात भटके विमुक्त आघाडीचे संपूर्ण राज्यातून महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचर

श्याम राजपूत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad