जागतिक अपंग दिनानिमित्त शिरवली तारांगण मतिमंद मुलांच्या शाळेत दिव्यांग उत्सव साजरा
मुरबाड ४ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
मुरबाड तालुक्यातील शिरवली येथे तारांगण मतिमंद शाळेमध्ये जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . तारांगण मतिमंद शाळेमध्ये मानव सेवा स्वथेचे अध्यक्ष सुरेश बांगर यांनी तालुक्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी तारागणं तेथील मुलांना मानव सेवा संस्थेच्या वतीने कपडे व इतर साहित्य
आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले
दोन वर्षाच्या कोरोनाच्या संकटा नंतर मोठ्या उत्सवाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला
या कार्यक्रमासाठी शाळेला नेहमी मदत करणारे राजकीय मंडळी पालक समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार किसन कथोरे यांनी या शाळेतील शिक्षक कर्मचारी व संस्थेचे अध्यक्ष यांचे विशेष कौतुक केले.
दोनच वर्षात या शाळेने सर्वांचा विश्वास सार्थ केलेला आहे हे काम सर्वात अवघड असून या संस्थेला सर्वांनी ताकद दिली पाहिजे आजच्या दिव्यांग दिनानिमित्त राज्यामध्ये प्रथमच दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने शाळेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल
या शाळेचा विकासशील आराखडा
तयार करा योग्य न्याय देऊन आपण या शाळेला अनुदान प्राप्त करण्यासाठी सहकार्य करू दिव्यांग बंधू भगिनींना मदत करणे समाजातील प्रत्येकाची कर्तव्य असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे मुरबाड तालुक्यामध्ये सध्या दिव्यांग संघटना मध्ये दलाल शिरले आहेत
त्यामुळे ते स्वतःचा फायदा घेत आहेत त्यांना बाजूला काढा असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी यावेळी व्यक्त केले
या प्रसंगी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसादजी पांढरे व मानव सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश बागरसर यांनी उपस्थितांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले तारांगणचा दुसरा वर्धापन दिन आमदार किसन यांनीं
मुलां सोबत केक कापून साजरा केला
या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे समाजसेवक मनोज देसले , राजेंद्र पाटील, माजि सभापती दीपक पवार, बारवी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर , अक्षय आगिवले, समाज सेविका शिल्पा देहेरकर, एन एन गायकर, व ठाणे मुबंई कल्याण , येथील मदत करणारे दानशूर व्यक्ती याचा सन्मान आमदार किसन कथोरे याचा हस्ते करण्यात आला .सर्वाचे आभार तारागणं शाळचे अध्यक्ष विकास म्हाडसे यांनी केले.